बाजारात एकीकडे मोठ्या एसयूव्ही गाड्यांची क्रेझ वाढत असताना दुसरीकडे छोट्या फॅमिली कारची मागणीही कायम असल्याचे दिसत आहे. याचाच प्रत्यय टाटा मोटर्सच्या टियागो या हॅचबॅक कारच्या विक्रीतून येतोय. जानेवारी ते ऑक्टोबर 2026 या अवघ्या 10 महिन्यांत या कारच्या तब्बल 70 हजार 555 युनिट्सची विक्री झाली आहे. कंपनीच्या लोकप्रिय मॉडेल्समध्ये टियागोने आपले स्थान टिकवून ठेवले आहे.
टाटाच्या विक्रीत टियागो तिसऱ्या क्रमांकावर
टाटा मोटर्सच्या 2026 मधील पहिल्या 10 महिन्यांच्या मॉडेलनिहाय विक्रीच्या आकडेवारीनुसार टियागोची 70,555 युनिट्स विकली गेली. कंपनीच्या कारमध्ये विक्रीच्या बाबतीत टियागो तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर टाटा पंच असून तिच्या 2 लाख 2 हजार 794 युनिट्सची विक्री झाली. तर दुसऱ्या क्रमांकावर टाटा नेक्सॉन असून तिच्या 1 लाख 96 हजार 490 युनिट्स विकल्या गेल्या. टियागोने मात्र सिएरा, हॅरियर, अल्टाझ, कर्व्ह आणि सफारीसारख्या मॉडेल्सपेक्षा अधिक विक्री नोंदवली आहे.
किंमत, इंजिन आणि वैशिष्ट्ये
टाटा टियागोची एक्स शोरूम किंमत 4.77 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटसाठी ती 8.62 लाख रुपयांपर्यंत जाते. पेट्रोल आणि सीएनजी असे दोन्ही पर्याय यात उपलब्ध आहेत. त्यामुळे कमी बजेटमध्ये कार घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक पर्याय ठरतो. टियागोमध्ये 1.2 लीटरचे 3 सिलिंडर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 86 पीएस पॉवर आणि 113 एनएम टॉर्क निर्माण करते. सीएनजी मोडमध्ये 75.5 पीएस पॉवर आणि 96.5 एनएम टॉर्क मिळतो. गिअरबॉक्ससाठी 5-स्पीड मॅन्यूअल आणि 5-स्पीड एएमटीचे पर्याय आहेत.
वैशिष्ट्यांच्या बाबतीत यात 10.25-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 360-डिग्री कॅमेरा, ब्लाइंड-व्ह्यू मॉनिटर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, मागील एसी व्हेंट्स, वायरलेस चार्जर आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी मिळते. सुरक्षेसाठी सर्व व्हेरिएंट्समध्ये 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशनसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल, आयसोफिक्स चाइल्ड सीट माउंट्स आणि रिअर पार्किंग सेन्सर्स यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
Leave a Reply