अमित शाह यांच्या तळेगाव दौऱ्यादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांची दिवसभर धरपकड करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. पुणे-मावळ भागात झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या नेत्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
विकासाच्या नावाखाली वृक्षतोड
विकासाच्या नावाखाली वृक्षतोड केली जात आहे. वृक्षतोडीमुळे दुर्मिळ पशुपक्षी नष्ट होणार आहेत. हे थांबले पाहिजे, अशी भूमिका काँग्रेसने मांडली. विकासाच्या कामांना काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका
कोणत्याही पक्षाच्या सभा असताना पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नये, अशी मागणी काँग्रेसने केली. दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांची दिवसभर धरपकड करण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
Leave a Reply