मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

‘उमंग तरंग’मध्ये बालकलाकारांच्या कलागुणांचे सादरीकरण

बालदिनाच्या निमित्ताने जळगावात ‘उमंग तरंग’मध्ये बालकलाकारांनी नृत्य, गायन आणि संगीत सादर केले. भाऊंचे उद्यानातील अ‍ॅम्फीथिएटरमध्ये रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

‘उमंग तरंग’मध्ये बालकलाकारांच्या कलागुणांचे सादरीकरण

बालदिनाच्या औचित्याने अनुभूती बालनिकेतन, विद्यानिकेतन आणि माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे ‘उमंग तरंग’ या बालकलागुणांच्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नृत्य, गायन, संगीत आणि रामायणातील प्रसंगांच्या प्रभावी सादरीकरणातून बालकलाकारांनी आपल्या कलागुणांची अनोखी झलक दाखवली. चिमुकल्यांच्या उत्साहाने, सुरेल स्वरांनी आणि नृत्याविष्काराने भाऊंचे उद्यानातील अ‍ॅम्फीथिएटर बालमय झाले. बालकलाकारांच्या प्रतिभेला जळगावकर रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

याप्रसंगी खासदार स्मिता वाघ, जळगावच्या महापौर दीपमाला काळे, अनुभूती निवासी स्कूलच्या संचालिका निशा जैन, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर, अभिनेत्री तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सदस्या गीतांजली ठाकरे, माणुसकी सेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा शुभदा नेवे आणि प्राचार्य मनोज परमार उपस्थित होते.

‘उमंग तरंग’चे पोस्टर फुग्यांसह आकाशात सोडून कार्यक्रमाचे विशेष उद्घाटन करण्यात आले. बालकलाकारांच्या सुप्त कलागुणांचे दर्शन घडविणाऱ्या या कार्यक्रमातून आपल्यालाही बालपणाची आठवण झाल्याची भावना खासदार स्मिता वाघ यांनी व्यक्त केली. मनोज परमार यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका मांडली. बालकलाकारांच्या चिठ्ठ्यांमधून आरव हर्षद जैन आणि अग्रजा गौरव कुलकर्णी यांची व्यासपीठावर येण्यासाठी निवड करण्यात आली. आर्या कुलकर्णी आणि स्पृहा नेवे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन केले. शुभदा नेवे आणि वंदना पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर शिल्पा दीक्षित यांनी आभार मानले.

सुरेल प्रवासाने रंगलेले सादरीकरण

‘उमंग तरंग’च्या सुरेल प्रवासाची सुरुवात अर्थम अथांग जैन आणि सहकाऱ्यांनी ‘अच्युतम केशवम’ हे गीत की-बोर्डवर सादर करून केली. वैदेही वाणी हिने ‘ओ माय फ्रेंड गणेशा’ या गाण्यावर नृत्य सादर केले. अग्रजा कुलकर्णी हिने शिवस्तुती गायली, तर सोहम जोशी याने ‘माय भवानीचा वाघ तू रे’ हे स्फूर्तिदायी गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. आरूह्या वरुण देशपांडे हिने ‘अरे नंदिनी’ हे सादरीकरण केले.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance