राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांनी स्वतःचे नाव, फोटो, व्हिडीओ, ओळख आणि वैयक्तिक शैलीची ट्रेडमार्क नोंदणी केली आहे. त्यांनी स्वतः पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
परवानगीशिवाय वापरावर कारवाईचा इशारा
पूर्वपरवानगीशिवाय कोणीही त्यांचे नाव, फोटो किंवा शैली व्यावसायिक तसेच वैयक्तिक फायद्यासाठी वापरू नये, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. या नोंदणीनंतर त्यांच्या नावाचा किंवा फोटोचा वापर करणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते.
विरोधकांचा हल्लाबोल
या ट्रेडमार्कवरून विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. रूपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटले आहे की, खरात प्रकरणात कुणी बोलू नये म्हणून चाकणकर धमक्या देत आहेत. चाकणकर सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात वादात सापडल्या आहेत.
Leave a Reply