मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

रोहित पठारे हत्येप्रकरणी दोषींना कठोर शिक्षा द्या

वैजापूर येथील रोहित पठारे हत्याकांडातील उर्वरित आरोपींना अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी भीमशक्तीने केली. पत्नीला शासकीय नोकरी देण्याचीही मागणी आहे.

रोहित पठारे हत्येप्रकरणी दोषींना कठोर शिक्षा द्या

येवला, ता. १६ : वैजापूर येथील रोहित पठारे हत्याकांडातील उर्वरित आरोपींना तातडीने अटक करून सर्वांना कठोर शिक्षा द्यावी, तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी रोहित पठारे यांच्या पत्नीला शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी भीमशक्तीचे नाशिक जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे यांनी केली. राज्यसभेचे खासदार तथा माजी समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशानुसार पगारे यांनी सहकाऱ्यांसोबत वैजापूर येथे रोहित पठारे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. विविध मागण्यांचे लेखी निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले.

कुटुंबीयांची भेट आणि शासकीय मदत

वैजापूर येथे झालेल्या या भेटीदरम्यान रोहित पठारे यांच्या आई-वडिलांसह पत्नी व नातेवाइकांशी पगारे यांनी संवाद साधत घटनेची माहिती घेतली. छत्रपती संभाजीनगरचे उपजिल्हाधिकारी अरुण जऱ्हाड, वैजापूरचे तहसीलदार सुनील सावंत तसेच समाजकल्याण विभागाचे अधिकारी यांनीही पीडित कुटुंबाची भेट घेतली. शासनातर्फे कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आली.

निवेदन आणि उपस्थिती

उपजिल्हाधिकारी अरुण जऱ्हाड तसेच उपविभागीय पोलिस अधिकारींना भीमशक्तीतर्फे लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी भीमशक्तीचे तालुकाध्यक्ष विजय घोडेराव, कार्याध्यक्ष बाळासाहेब आहिरे, तालुका उपाध्यक्ष विनोद त्रिभुवन, तालुका सचिव विधाता आहिरे, संघटक विजय पगारे, प्रशांत वाघ, राजाभाऊ आहिरे, युवराज पगारे, नितीन वाव्हुळ, सौ. कांता वाव्हुळ, वैजापूरचे युवा नेते राजवीर त्रिभुवन, आरपीआयचे तालुकाध्यक्ष साहेबराव पडवळ, बाळासाहेब त्रिभुवन, संदीप गायकवाड, लहानू त्रिभुवन, बसपाचे नेते बाबासाहेब पगारे आदी उपस्थित होते.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance