पुणे येथील सह्याद्री फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रांत उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील गुणवंतांना ‘नक्षत्र आयकॉन ॲवॉर्ड २०२६’ अंतर्गत महाराष्ट्र समाजरत्न गौरव पुरस्काराने रविवारी, १५ नोव्हेंबर रोजी पुणे येथे सन्मानित करण्यात आले. धुळ्याचे किरण ज्ञानेश्वर चौधरी यांना मान्यवरांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
किरण चौधरी हे आमदार अनुप अग्रवाल यांचे स्वीय सहाय्यक आहेत. त्यांचे सामाजिक योगदान, त्यांची मेहनत आणि यशाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. सह्याद्री फाउंडेशनतर्फे दरवर्षी राज्यातील विविध क्षेत्रांत सातत्यपूर्ण काम करणाऱ्या गुणवंतांना या पुरस्काराने गौरविण्यात येते.
चिंचवडमध्ये रंगला सन्मान सोहळा
पुण्यातील चिंचवड येथील ‘ऑटो क्लस्टर डेव्हलपमेंट आणि रिसर्च इन्स्टिट्यूट’मध्ये रविवारी दुपारी चार वाजता हा सोहळा पार पडला. शास्त्रज्ञ डॉ. अभिजित दास, अभिनेत्री आर्या घारे आणि समाजसेवक डॉ. राजेंद्रसिंग वालिया यांच्या हस्ते किरण चौधरी यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि पदक देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना मान्यवरांनी चौधरी यांच्या कार्याचे कौतुक केले.
पुरस्काराबद्दल समाधान व्यक्त करताना किरण चौधरी यांनी आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही समाजहितासाठी कार्यरत राहणार असल्याची भावना व्यक्त केली.
Leave a Reply