बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

गोमातेच्या सन्मानासाठी १ डिसेंबरला मुंबईत आंदोलन

गोहत्या बंदी आणि गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा या मागण्यांसाठी १ डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी आंदोलन होणार आहे. जळगाव जिल्ह्यातून सुमारे दोन हजार गोसेवक सहभागी होणार आहेत.

गोमातेच्या सन्मानासाठी १ डिसेंबरला मुंबईत आंदोलन

देशभरात गोहत्या पूर्णपणे बंद करावी आणि गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा, या मागण्यांसाठी ‘गो सन्मान आव्हान अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत १ डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातून सुमारे दोन हजार गोसेवक या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती मनोजचंद्र महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अभियानाची माहिती देण्यासाठी मंगळवारी जळगावातील विसनजी नगरातील गायत्री मंदिरात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भाजपचे महापालिकेतील गटनेते प्रकाश बालाणी, गोसेवक श्याम करमचंदाणी, गायत्री मंदिराचे सदस्य तुकाराम माळी आणि हरी देशमुख उपस्थित होते. मनोजचंद्र महाराज म्हणाले, की १ डिसेंबरला दुपारी दोन वाजता आंदोलनाला सुरुवात होईल.

प्रमुख मागण्या कोणत्या?

या आंदोलनानिमित्त राबविण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेतील सह्यांसह राज्य शासनाला निवेदन देण्यात येणार आहे. देशात गोहत्या बंदीचा कठोर कायदा करणे, गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देणे, गोसेवकांसाठी केंद्रीय कायदा करणे आणि स्वतंत्र केंद्रीय गो मंत्रालय स्थापन करणे, या प्रमुख मागण्या आहेत. या आंदोलनात सर्व हिंदू संघटनांचे प्रतिनिधी आणि गोसेवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकाश बालाणी यांनी केले आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance