झिम्मा आणि झिम्मा २ या चित्रपटांच्या भरघोस यशानंतर दिग्दर्शक हेमंत ढोमे आता झिम्मा ३ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मैत्री, धमाल आणि मनोरंजनाचा नवा अध्याय घेऊन हा चित्रपट नव्या वर्षात प्रदर्शित होणार आहे.
रिलीज डेट जाहीर
झिम्मा ३ हा चित्रपट १ जानेवारी २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना मैत्रीची ही गोष्ट पाहायला मिळणार आहे.
सिद्धार्थ चांदेकर महत्त्वाच्या भूमिकेत
या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्या दोन भागांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती; त्यामुळे तिसऱ्या भागाबद्दलही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
Leave a Reply