पुण्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आज त्यांच्या हस्ते दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.
जेडब्ल्यू मॅरीएटमध्ये बैठक
अमित शाह यांच्या भेटीसाठी अनेक नेते पुण्यात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांची भेट घेतली. ही भेट पुण्यातील जेडब्ल्यू मॅरीएट हॉटेलमध्ये झाली. यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील उपस्थित होते.
मंत्रिपदावर चर्चा?
या भेटीनंतर केंद्रीय मंत्रिपदाबाबत चर्चा सुरू झाली आहे. बैठकीत नेमके काय ठरले, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply