धुळे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने होणाऱ्या १४ वर्षांखालील आमंत्रित क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. या संघाचे कर्णधारपद सार्थक भूपेश पाटील याच्याकडे सोपवण्यात आले आहे. ही स्पर्धा १३ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत कुंडाणे (ता. धुळे) येथील एमसीए क्रिकेट मैदानावर, तसेच नाशिक येथील मैदानावर खेळवली जाईल.
स्पर्धेच्या ‘ब’ गटात धुळे जिल्ह्यासह रायगड, रत्नागिरी, नांदेड, पूर्व विभाग, ॲम्बिशन्स क्रिकेट क्लब (पुणे) आणि सीएनए क्रिकेट क्लब (पुणे) हे संघ आहेत. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर महाराष्ट्राच्या १४ वर्षांखालील संघाची निवड केली जाणार आहे.
धुळ्याचे सामने कधी, कुणाविरुद्ध
धुळे संघाचे सामने १३ ते १४ नोव्हेंबरदरम्यान सीएनए क्रिकेट क्लब (पुणे) विरुद्ध धुळे येथे, १६ ते १७ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी विरुद्ध धुळे, २२ ते २३ नोव्हेंबर रोजी पूर्व विभागाविरुद्ध धुळे, २५ ते २६ नोव्हेंबर रोजी ॲम्बिशन्स क्रिकेट क्लब (पुणे) विरुद्ध नाशिक, २८ ते २९ नोव्हेंबर रोजी रायगड विरुद्ध नाशिक आणि १ ते २ डिसेंबर रोजी नांदेड विरुद्ध धुळे येथे होतील.
उत्तर विभागाच्या संघात जिल्ह्यातील अंश प्रवीण खळगे, ऋतुराज संदीप पाटील, सचिन रावण पावरा आणि आदित्य ललित पाटील या चार खेळाडूंची निवड झाली असून, त्यांचे सामने पुणे येथे होणार आहेत. संघात निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल आणि सल्लागार राजवर्धन कदमबांडे यांनी अभिनंदन केले.
धुळे जिल्हा संघ
सार्थक भूपेश पाटील (कर्णधार), दक्ष विजय वाघ, शिवम संदीप गुजराथी, निरंजन खेतमल चौरे, आराध्य दिनेश बोरसे, देवांशू नीलेश कोळी, सदिम साजिद शहा, आरव दीपक बिडकर, आराध्या प्रशांत देवरे, मलय अनिकेत सेठी, आराध्या सचिन कुलकर्णी, वेदांत गोरख पाटील, भूपेश पाटील, तुषार महेंद्र कोळेकर आणि यश दिनेश पाठक यांचा संघात समावेश आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून फिरोज शेख आणि सहाय्यक प्रशिक्षक म्हणून आनंद जगताप यांची निवड झाली आहे.
Leave a Reply