नांदूरशिंगोटे येथील डी. पी. खर्डे नवजीवन फार्मसी महाविद्यालयाचा जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त गौरव करण्यात आला आहे. राज्य औषध व्यवसाय परिषदेतर्फे नाशिक विभागातून महाविद्यालयाला हा सन्मान मिळाला आहे.
महाविद्यालयाने ‘असोसिएशन्स अँड इन्स्टिट्यूशन्स’ विभागातील ‘फार्मसी इन्स्टिट्यूट’ श्रेणीत नाशिक विभागातून विजेतेपद प्राप्त केले आहे. फार्मसी क्षेत्रातील योगदान, जनजागृती आणि व्यावसायिक बांधीलकीस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त विविध उपक्रम आणि गौरवपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली यश
प्राचार्य डॉ. हितेशकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास, आरोग्यविषयक जनजागृती आणि फार्मसी व्यवसायाविषयी सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.
या यशामध्ये संस्थेचे व्यवस्थापन, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे सामूहिक योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.
मान्यवरांकडून गौरव
संस्थेच्या अध्यक्षा विजया देशमुख, व्यवस्थापकीय विश्वस्त सुभाष देशमुख, सचिव विजय काळे आणि संचालिका शिरीन देशमुख यांनी प्राचार्य डॉ. हितेशकुमार अग्रवाल, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गौरव केला.
Leave a Reply