अकोला शहरात पुढील काळात पाणीटंचाईचे संकट उभे राहू नये, यासाठी प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. पुढील पावसाळ्यापर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे १३२ कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून शासनाने त्याला प्रशासकीय मान्यता दिली आहे.
या आराखड्याअंतर्गत मोर्णा ते महान जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम अडीच ते तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती आमदार रणधीर सावरकर यांनी दिली. महानगरपालिका स्थायी सभागृहात गुरुवारी (ता. १२) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पाइपलाइन आणि पंपिंग व्यवस्था
महान-मोर्णा प्रकल्पातून महान येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ७०० मिमी आणि ६०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. या कामासाठी ८७.६७ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून सुमारे २५.२० किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकली जाणार आहे. तसेच मोर्णा धरणावर पंपिंग व्यवस्था उभारण्यात येणार आहे.
पर्यायी उपाययोजनाही नियोजनात
अकोट येथून टँकरद्वारे पाणी आणणे आणि शहरातील विविध भागांत पाणी साठवणुकीची व्यवस्था उभारणे, असे दोन प्रमुख पर्यायही नियोजनात समाविष्ट करण्यात आले आहेत. या उपाययोजनांमुळे शहराच्या पाणीपुरवठ्याला दिलासा मिळणार असल्याचे आमदार सावरकर यांनी सांगितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply