गेल्या काही वर्षांमध्ये विमान अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. बारामती विमानतळावर गेल्या काही दिवसांमध्ये दोन विमान अपघातांच्या घटना घडल्या होत्या. त्यापूर्वी अहमदाबादमध्येही भीषण विमान अपघात झाला होता. दरम्यान, आता सोलापूरमधून आणखी एक घटना समोर आली आहे. सोलापूर विमानतळावर एका शिकाऊ विमानाचा अपघात झाला आहे.
टेक ऑफपूर्वीच धावपट्टीवरून घसरले
शिकाऊ वैमानिक विमानाचे टेक ऑफ करत असतानाच विमान धावपट्टीवरून घसरल्याची माहिती समोर आली आहे. विमान उड्डाण करत असतानाच ते धावपट्टीच्या खाली गेल्याने हा अपघात झाला. सुदैवाने विमानातील शिकाऊ वैमानिक असलेल्या महिलेला कोणतीही हानी झालेली नाही.
अधिकृत माहिती अद्याप आलेली नाही
या घटनेबाबत सोलापूर विमानतळ प्राधिकरणाकडून अद्याप कोणतीही अधिक माहिती देण्यात आलेली नाही. अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबतची माहिती समोर येणे बाकी आहे. विमानतळ परिसरात घडलेल्या या घटनेमुळे काही काळ खळबळ उडाली होती.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply