मोबाईल आणि ऑनलाइन माध्यमांच्या काळात वाचन संस्कृती मागे पडत चालली असताना धुळ्यातील राजवाडे संशोधन मंडळ ग्रंथालयाने वाचकांसाठी १२१ प्रकारच्या दिवाळी अंकांची पर्वणी उपलब्ध करून दिली आहे. या विशेष योजनेचा प्रारंभ धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर झाला. वाचकांना माफक दरात वर्षभर विविध विषयांचे दिवाळी अंक उपलब्ध करून देणारी ही संधी आहे.
विविध विषयांचे अंक
या संग्रहात विनोदी, ललित, रहस्य कथा, ज्योतिष विज्ञान, आरोग्य, तसेच महिला आणि बालकांसाठी विशेष दिवाळी अंकांचा समावेश आहे. वाचन छंद जोपासण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल, असे मंडळाचे कार्याध्यक्ष संजय मुंदडा यांनी सांगितले. सर्व वाचकप्रेमींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभ सोहळा
प्रारंभी ग्रंथालयाची व दिवाळी अंकाची माहिती देताना संचालिका जयश्री शहा यांनी वाचकांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या प्रसंगी मंडळाचे व्यवस्थापक विकास कपोले, सहायक ग्रंथपाल रेणुका शिंदे, वैशाली कुलकर्णी, राजश्री भडागे, सोनाली वाघ, भुषण बर्गे, प्रकाश कुलकर्णी, परेश चंद्रात्रे, दुर्गेश जोशी, गुलाब भील, दर्शन माळी, नाना सोनवणे, शरद पंडित आदी उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply