उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. योजनेअंतर्गत प्रलंबित असलेली देयके पुढील १५ दिवसांत लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहेत.
नागरी पुरवठा मंत्री संकल्प आमोणकर यांनी ही माहिती दिली. योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जांवर प्रक्रिया सुरू असून उर्वरित लाभार्थ्यांना लवकरच आर्थिक लाभ मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आणखी वाचा ·मनोज परब २२ नोव्हेंबरला आरजीपीत परतणार
अडीच लाखांहून अधिक अर्ज प्राप्त
नागरी पुरवठा विभागाला उज्ज्वला योजनेअंतर्गत आतापर्यंत २.५ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रलंबित देयके वितरित झाल्यानंतर लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply