प्रकाश आणि मांगल्याचा दीपोत्सव सुरू झाल्यानंतर दिवाळीच्या फराळाची सर्वत्र लगबग सुरू आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर शहरी आणि ग्रामीण भागातील महिला फराळ बनवण्यासाठी धावपळ करत आहेत. दुष्काळी परिस्थिती बाजूला ठेवून सर्वच कुटुंबे आपापल्या परीने सणाचा गोडवा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
घरगुती फराळाची जागा आता आचारी घेत आहेत
दिवाळीचा सण हा गोडवा आणि चैतन्य आणणारा आहे. घरोघरी दिवाळीच्या फराळाची लगबग सुरू झाली आहे. पूर्वी घराघरांत महिला एकत्र येऊन चकल्या, करंज्या, लाडू, चिवडा आणि शंकरपाळे असे विविध पदार्थ तयार करत असत. मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे आणि वेळेच्या अभावामुळे आता अनेक महिला घरगुती फराळ बनवण्यासाठी आचाऱ्यांकडून तयार करून घेतात.
गोड पदार्थ १५० रुपये तर तिखट पदार्थ १२० रुपये किलो दराने आचारी बनवून देत आहेत. शेव, पापडी, लाडू, शंकरपाळे, बालुशाही, गुलाबजाम, बुंदी लाडू आणि चिवडा या पदार्थांना प्राधान्य दिले जात आहे.
शहरात ठिकठिकाणी फराळाचे स्टॉल
फराळाचे साहित्य खरेदी करून नंबर लावत आचाऱ्याकडून पदार्थ तयार करण्यात अनेक जण व्यस्त आहेत. मालेगाव कॅम्प परिसरातील सटाणा नाका, डिके चौक, रावळगाव नाका, संगमेश्वर आणि सोयगाव यांसह शहरातील विविध भागांत आचाऱ्यांनी फराळ बनवून देण्याचे स्टॉल लावले आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply