नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सर डॉ. मो. स. गोसावी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात ‘फार्मास्युटिकल संशोधनातील आधुनिक तंत्रज्ञान व नवोन्मेष’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद उत्साहात पार पडली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
परिषदेचे उद्घाटन डॉ. मिलिंद वाघ, डॉ. दीप्ती देशपांडे, डॉ. सुनील महाजन आणि प्राचार्य डॉ. सुनील अमृतकार यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी संशोधन निबंधांच्या सारांश पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. परिषदेत एकूण ३७३ जणांनी सहभाग घेतला.
दोन दिवसांचे मार्गदर्शन आणि सादरीकरण
पहिल्या दिवशी डॉ. प्रणव जे. शाह आणि डॉ. योगेश्वर बच्छाव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या पोस्टर सादरीकरणाचे मूल्यमापन करून पारितोषिके देण्यात आली. दुसऱ्या दिवशी डॉ. हर्षद कोठावदे, डॉ. एल. साथियानारायणन आणि डॉ. अरुलमोझी एस. यांनी आपले विचार मांडले.
डॉ. विपुलता येवले, डॉ. विशाल जाधव, डॉ. रावसाहेब घेगडे, डॉ. रमणलाल कचवे आणि डॉ. विजय लांबोळे यांनी सत्रांचे अध्यक्षपद भूषवले. डॉ. नमिता जोशी, डॉ. भंडारी, श्री. संदीप पुरकर, डॉ. शिल्पा हरक आणि स्मिता शेळके यांनी समन्वय सांभाळला, तर डॉ. साहेबराव बोरस्ते, डॉ. दत्तात्रेय शिनकर आणि डॉ. प्रशांत पिंगळे यांनी संयोजनाची जबाबदारी पार पाडली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने परिषद यशस्वी झाली.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply