दिवाळीत पोह्यांचा चिवडा हमखास बनवला जातो. पोह्यांचा कुरकुरीत चिवडा खायला सर्वांनाच आवडतो. पण तुम्ही नेहमीचा पोह्यांचा चिवडा खाऊन कंटाळला असाल, तर यंदा मक्याचा चिवडा बनवून पाहा. मक्याचा चिवडा घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही सोप्या पद्धतीने हा चिवडा बनवू शकता.
साहित्य
मक्याचा चिवडा बनवण्यासाठी मका, शेंगदाणे, डाळी, काजू, मनुके, हिरवी मिरची, कढीपत्ता, हळद, पिठीसाखर, तेल, तूप आणि मीठ हे साहित्य वापरा. याशिवाय चवीसाठी चिमूटभर हिंगही लागेल.
कृती
मक्याचा चिवडा बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर कढईमध्ये तेल किंवा तूपामध्ये कॉर्न हलकेसे कुरकुरीत फ्राय करून घ्या. कॉर्न कुरकुरीत झाल्यानंतर एका प्लेटमध्ये बाजूला काढून घ्या. नंतर त्याच कढईत शेंगदाणे फ्राय करा. शेंगदाणे फ्राय झाले की त्यात काजू, मनुके आणि डाळी फ्राय करा. नंतर या कढईत हिरवी मिरची आणि कढीपत्ता पाने चांगले खरपूस फ्राय करून घ्या. त्यानंतर त्यात हळद आणि चिमूटभर हिंग घाला. नंतर या मिश्रणात परतून घेतलेले कॉर्न मिक्स करा. चिवड्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पिठीसाखर मिक्स करा. अशा प्रकारे कुरकुरीत कॉर्न फ्लेक्स चिवडा तयार होईल.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply