राज्यात दुष्काळाचे संकट असताना राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अल्पसंख्याक समाजातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली स्वतंत्र हेल्पलाईन सुविधा बंद करण्यात आली आहे. या हेल्पलाईनऐवजी आता शासनाच्या ११२ या हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
२००९ पासून सुरू होती सेवा
ही स्वतंत्र हेल्पलाईन ५ फेब्रुवारी २००९ रोजी शासन निर्णयाद्वारे सुरू करण्यात आली होती. अल्पसंख्याक समाजातील नागरिकांच्या अडीअडचणी आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी ही सेवा कार्यरत होती. आता ही सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी उपाययोजना
राज्यात दुष्काळाचे संकट आले असून या काळात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. दुसरीकडे सरकारी तिजोरीवर भार ठरणाऱ्या योजना गुंडाळण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर ही हेल्पलाईन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना आता त्यांच्या तक्रारी आणि अडचणींसाठी ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा लागणार आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply