नाशिक, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर सायंकाळी नाशिकच्या रामकुंडावर महा गोदा आरती झाली. गोदावरीच्या तीरावर हजारो दीप एकाच वेळी उजळले आणि संपूर्ण रामकुंड परिसर दीपांच्या प्रकाशाने उजळून निघाला.
या महा गोदा आरतीत ६२३३ जणांनी एकाच वेळी आरती केली आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाला. पांढऱ्या वेशातील आरतीकार, डोक्यावर सिंहस्थ कुंभाच्या टोप्या, हातात दीप — अशा या भव्य आरतीने गोदातीरावर भक्तीचे अपूर्व दृश्य साकारले.
रामकुंडावरील मंदिरावर रंगीत रोषणाई करण्यात आली होती. गोदावरीच्या पाण्यात दीपांचे प्रतिबिंब पडले होते. मंचावर साधू-संत आणि मान्यवर उपस्थित होते. हजारो भाविकांनी ही आरती प्रत्यक्ष पाहिली.
या ऐतिहासिक संध्याकाळची ही छायाचित्र गॅलरी — दीप, आरती, गोदावरी आणि रामकुंडाचे ते तेजस्वी क्षण.
फोटो गॅलरी























Leave a Reply