जळगाव येथे अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडळाच्या निर्देशानुसार जळगाव तेरापंथ महिला मंडळातर्फे ‘माझी शक्ती, माझी ओळख’ आणि युवती विभागातर्फे ‘डिस्कव्हर युवर शक्ती’ हे कार्यक्रम घेण्यात आले. महिलांमधील आत्मविश्वास, कौशल्य आणि सुप्त गुणांना वाव देणे हा या उपक्रमांचा उद्देश होता.
स्पर्धा आणि निकाल
या कार्यक्रमात अध्यक्षा विनीता समदरिया यांनी ‘श्री उत्सव प्रदर्शना’त ग्राम श्रेणीत प्रथम क्रमांक मिळाल्याची माहिती दिली. यावेळी परीक्षक म्हणून अग्रवाल समाजाच्या अध्यक्षा पूजा अग्रवाल तसेच राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व महाराष्ट्र प्रभारी निर्मला छाजेड उपस्थित होत्या. या उपक्रमात घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये कन्या मंडळाच्या रांगोळी स्पर्धेत रिद्धी उमेश चौरडिया यांनी प्रथम क्रमांक मिळविला. ‘माझी शक्ती, माझी ओळख’ स्पर्धेत मयूरी कोठारी प्रथम, सुनीता दुगड द्वितीय, तर मीना छाजेड तृतीय आल्या. ‘डिस्कव्हर युवर शक्ती’ स्पर्धेत प्रज्ञा दुगड प्रथम, कोमल राहुल छाजेड द्वितीय आणि विजयश्री लालवानी यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
रौनक चौरडिया व मयूरी कोठारी यांनी सूत्रसंचालन केले, तर दक्षता सांखला यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply