बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर हे अभिनयाबरोबरच आपल्या फिटनेसमुळेही नेहमीच चर्चेत असतात. वयाची ६९ वर्षे पूर्ण झाली असली, तरी ते आजही एखाद्या तरुणासारखेच दिसतात. त्यांच्या तारुण्याचे रहस्य खुद्द त्यांनीच सांगितले आहे. २०२० मध्ये दिलेली त्यांची एक मुलाखत सध्या पुन्हा चर्चेत आली असून त्यात त्यांनी आपल्या फिटनेसचे सिक्रेट उघड केले आहे.
व्यायामाची दिनचर्या
स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी अनिल कपूर नियमितपणे स्ट्रेंथ ट्रेनिंग करतात. याशिवाय सायकलिंग आणि रनिंगचाही त्यांच्या दिनचर्येत समावेश आहे. शरीर सतत सक्रिय ठेवणे आवश्यक असल्याचे ते सांगतात. व्यायामामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि वयाचा परिणाम जाणवत नाही, असे त्यांचे मत आहे.
सकारात्मक विचार आणि आहार
व्यायामाबरोबरच मनात सकारात्मकता असणे तेवढेच गरजेचे आहे, असे अनिल कपूर सांगतात. ते मनात कायम सकारात्मक भावना ठेवतात आणि नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात. निरोगी आयुष्यासाठी चांगले अन्न खाणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. आपण जेवत असलेल्या जेवणातूनच ७० ते ८० टक्के आजार होतात, त्यामुळे पौष्टिक अन्न खाणे खूप गरजेचे आहे, असे ते सांगतात.
प्रतिक्रिया व्यक्त करा