पालघर जिल्ह्यातील सफाळे येथे सराफा दुकानावर सशस्त्र दरोडा पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास पायल ज्वेलर्स हे दुकान बंद करत असताना चार अज्ञात दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत सोने-चांदीची बॅग लुटून नेली.
प्रतिकार करणाऱ्या मालकावर हल्ला
दुकानमालक सुनील सोनी यांनी दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी दांडक्याने त्यांच्या डोक्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सोनी जखमी झाले. लुटीची बॅग घेऊन चारही दरोडेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
परिसरात भीतीचे वातावरण
या घटनेमुळे सफाळे परिसरात एकच खळबळ उडाली असून व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच सफाळे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा