, २८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

रात्री ३ वाजता घरी बोलावलं; मनिषा राणीने ठाम नकार दिला

अभिनेत्री मनिषा राणीने करिअरच्या सुरुवातीला कास्टिंग काऊचचा सामना केल्याचा अनुभव सांगितला आहे. रात्री तीन वाजता घरी बोलावणाऱ्या व्यक्तीला तिने ठाम नकार दिला.

रात्री ३ वाजता घरी बोलावलं; मनिषा राणीने ठाम नकार दिला

अनेक कलाकार बॉलिवूडच्या आकर्षणाने मुंबईत येतात. अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवून रातोरात प्रसिद्ध होण्याचे स्वप्न ते पाहतात. मात्र सर्वांनाच यश मिळते असे नाही. जवळपास प्रत्येक कलाकाराला प्रचंड संघर्ष करावा लागतो. प्रसंगी उपाशी राहून दिवस ढकलावे लागतात. केवळ पुरुषच नव्हे, तर स्त्री कलाकारांनाही या संघर्षातून जावे लागते. महिलांसाठी तर परिस्थिती अधिकच कठीण असते. अभिनेत्री मनिषा राणी हिलाही असाच एक धक्कादायक अनुभव आला होता. अनेक वर्षांनंतर तिने हा अनुभव मांडला आहे.

मनिषा राणी ही बिहारच्या एका खेड्यातून निघून थेट इंडस्ट्रीत आली. तिने स्वतःच्या मेहनतीने नाव कमावले. आज मनिषा ही केवळ टीव्ही इंडस्ट्रीतच नव्हे, तर सोशल मीडियातही स्टार बनली आहे. तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. पण करिअरच्या या टप्प्यावर पोहोचण्याचा तिचा प्रवास सोपा नव्हता. तिला खूप मेहनत करावी लागली, तेव्हाच ती या टप्प्यावर पोहोचली.

सुरुवातीच्या काळातील धक्कादायक अनुभव

मनिषाला करिअरच्या सुरुवातीला कास्टिंग काऊचचाही सामना करावा लागला. एका मुलाखतीत तिने सुरुवातीच्या काळातील दाहक आणि अत्यंत वाईट अनुभव शेअर केला आहे. हा प्रसंग सांगताना ती स्वतः हादरून गेली होती. हा प्रसंग कुणाच्याही आयुष्यात येऊ नये, असे म्हणताना ती दिसली.

काही लोकांनी कामाच्या बदल्यात तिला फेव्हर मागितला का, असा सवाल मनिषाला करण्यात आला. त्यावर तिने होकार दिला. एक व्यक्ती होता. त्याने तिचे अनेक व्हिडीओ पाहिले होते. तू सिलेक्ट होशील, असे त्याने तिला सांगितले. तिचा आत्मविश्वास वाढवला. त्यानंतर एक ४५-५० वर्षांचा माणूस होता. त्याने कामाबाबत तिला बरीच आश्वासने दिली. ती बिहारमध्ये असताना तो तिच्या संपर्कात होता.

नकारानंतर घेतलेला निर्णय

जेव्हा मनिषा मुंबईत आली, तेव्हा तो तिला भेटायला बोलावत होता. एकदा तर त्याने रात्री ३ वाजता तिला फोन करून भेटायला बोलावले. माझ्या घरी ये, असे तो तिला म्हणाला. त्याचे बोलणे ऐकूनच तिला घाम फुटला. हिंमत करून तिने त्याला भेटायला नकार दिला. तुझ्या घरी येऊ शकत नाही, असे तिने त्याला सांगितले. त्यावर तो तिच्याशी रागाने बोलायला लागला. मी येणार नाही, असे बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली, असा सवाल त्याने तिला केला.

तुला मी इंडस्ट्रीत टिकू देणार नाही, असे म्हणून त्याने फोन कट केला. त्यानंतर मनिषानेही मोठा निर्णय घेतला. त्याचा नंबरच तिने ब्लॉक करून टाकला. तो तिला काही काम देणार नाही, हे एव्हाना तिच्या लक्षात आले होते, असे मनिषाने सांगितले. मनिषा आज टीव्हीच्या दुनियेतील मोठी स्टार आहे. तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे आणि प्रेक्षकांच्या हृदयात तिने स्थान निर्माण केले आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance