दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू नुकतीच आई झाली आहे. तिने आणि तिचा पती, दिग्दर्शक राज निदिमोरू यांनी मुलाचे स्वागत केले आहे. त्यांच्या मुलाचे नाव देव निदिमोरू असे ठेवण्यात आले आहे. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी मुलाचा जन्म झाला. बाळाच्या आगमनाने दोघांच्या आयुष्यात आनंदाचे वातावरण असले, तरी डिलिव्हरीपूर्वी संपूर्ण कुटुंब चिंतेत होते.
राज निदिमोरू यांची आत्या आणि प्रसिद्ध गायिका डॉ. शोभा राजू यांनी एका मुलाखतीत डिलिव्हरीदरम्यान नेमके काय घडले होते, याबद्दल माहिती दिली.
स्कॅनमध्ये नाळ गुंडाळल्याचे दिसले
डॉ. शोभा राजू यांनी सांगितल्यानुसार, डिलिव्हरीपूर्वी करण्यात आलेल्या स्कॅनमध्ये बाळाच्या गळ्याभोवती नाळ गुंडाळल्याचे दिसून आले होते. त्यामुळे बाळाच्या हालचालींबाबत कुटुंबीयांना चिंता वाटू लागली होती. मात्र नंतर डॉक्टरांनी बाळाच्या हालचाली व्यवस्थित असल्याचे सांगितले. त्यामुळे कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला.
३० मिनिटांची प्रार्थना
पुढे जेवणाच्या वेळी राज निदिमोरू यांनी फोन करून डॉक्टरांनी समंथाला सी-सेक्शनद्वारे बाळाला जन्म देण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले. हे ऐकल्यानंतर कुटुंबीय घाबरले. समंथा आणि बाळ सुखरूप असावेत, यासाठी सर्वांनी प्रार्थना करण्यास सुरुवात केली. डॉ. शोभा राजू यांच्या माहितीनुसार, कुटुंबीयांनी जवळपास २५ ते ३० मिनिटे प्रार्थना केली. त्यानंतर राज यांचा पुन्हा फोन आला आणि त्यांनी आनंदाची बातमी दिली.
प्रतिक्रिया व्यक्त करा