केंद्र सरकारने चार दिवसीय संसद अधिवेशन बोलावले आहे. ३० नोव्हेंबर रोजी लोकसभेचे तर २ डिसेंबर रोजी राज्यसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनात लोकसभेत महिला आरक्षण बिल लागू करण्यासाठी केंद्र सरकार पुन्हा नवीन सुधारणा विधेयक आणत आहे.
जागा वाढीचा प्रस्ताव
३० नोव्हेंबर रोजी लोकसभेत राज्यघटना (१३२ वी सुधारणा) विधेयक, २०२६ सादर केले जाणार आहे. या विधेयकात प्रत्येक राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची संख्या ५० टक्के वाढवण्याचा प्रस्ताव आहे. दक्षिण भारतातील राज्यांत त्या तुलनेत खासदार आणि आमदारांच्या जागा वाढणार नाहीत. योग्य प्रतिनिधित्व मिळणार नाही, अशी शंका होती; ती दूर करण्याचा प्रयत्न या नवीन विधेयकातून केला जात असल्याचे सांगितले जात आहे.
पवार गटाची भूमिका अद्याप स्पष्ट नाही
मोदी सरकारने हे विधेयक संसदेत मंजूर करण्यासाठी तयारी केली आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या विधेयकाला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी सावध भूमिका घेतली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसने सोशल मीडियावर पोस्ट करत शरद पवार यांच्या पक्षाच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने म्हटले आहे की, शरद पवार यांना वयाच्या ८५व्या वर्षी पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होणार होती; राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे अवघे दहा आमदार होते आणि एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी ३६ मतांची आवश्यकता होती.
प्रतिक्रिया व्यक्त करा