बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ‘किंग’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील दुसरं गाणं ‘डॅडी कूल’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात शाहरुख खान आणि करीना कपूर खान यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. त्यामुळे गाणं प्रदर्शित होताच चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
१५ वर्षांनंतर पुन्हा एकत्र
मुंबईत आयोजित एका विशेष इन्स्टाग्राम इव्हेंटमध्ये या गाण्याचं लॉन्चिंग करण्यात आलं. यावेळी शाहरुख आणि करीना एकत्र उपस्थित होते. तब्बल १५ वर्षांनंतर ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एकत्र आल्याने चाहत्यांचा उत्साह वाढला आहे. दोघांची केमिस्ट्री पाहून चाहत्यांना त्यांच्या जुन्या चित्रपटांची आठवण झाली. शाहरुखने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हे गाणं शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. ‘बेबोसोबत पुन्हा एकदा… ओल्ड स्कूल गाणं, पण तरीही कूल आहे! डॅडी कूल’, अशा शब्दांत त्याने गाण्याची ओळख करून दिली.
गाण्यामागची टीम
‘डॅडी कूल’ या गाण्याला सचिन-जिगर यांनी संगीत दिलं आहे. कुमार यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. तर लोकप्रिय गायक अरिजित सिंग आणि शिल्पा राव यांनी आपल्या आवाजाने गाण्याला चार चाँद लावले आहेत. या डान्स नंबरचं नृत्यदिग्दर्शन प्रसिद्ध कोरिओग्राफर वैभवी मर्चंट यांनी केलं आहे. गाण्यात शाहरुख आणि करीनाचा धमाकेदार अंदाज पाहायला मिळत आहे. त्यामुळेच हे गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरत असल्याचं दिसत आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा