अभिनेता शरद कपूरचा संघर्ष सध्या मनोरंजन क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे. समाजमाध्यमांवर त्याचा एक व्हिडिओ फिरू लागल्यानंतर त्याच्या प्रकृतीबद्दल आणि आर्थिक स्थितीबद्दल चर्चा सुरू झाली. मात्र शरदने स्वतः स्पष्ट केले आहे की, पैशाच्या अडचणीपेक्षा पुन्हा काम मिळवण्याची इच्छा त्याच्यासाठी अधिक महत्त्वाची आहे.
प्रकृती आणि पायाची दुखापत
अभिनयापासून दूर राहण्यामागे प्रकृतीच्या अडचणी आणि मानसिक तणाव असल्याचे त्याने सांगितले आहे. पायाला झालेल्या दुखापतीमुळे त्याला बराच काळ अंथरुणावर राहावे लागले. त्यानंतर आता मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी शरदबद्दल केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे.
लंडनमधील शूटिंगचा प्रसंग
दीपाली सय्यद यांनी शरदसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. एकेकाळी चित्रपटांत काम करणाऱ्या शरदची आजची अवस्था पाहून त्यांनी खंत व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, चित्रपटसृष्टीत अनेक गोष्टी घडतात; आयुष्यात चढउतार येतात, पण त्या काळात स्वतःला कसे सावरायचे हे महत्त्वाचे असते. शरदच्या आयुष्यात एक असा टप्पा आला असेल, जेव्हा त्याने काम करणे सोडले आणि हार मानली, असे त्यांना वाटते. लंडनमध्ये एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी त्या शरदसोबत गेल्या होत्या. आठ दिवस त्या तिथे होत्या, पण तो चित्रपट झालाच नाही. दोन दिवसांत सनी देओल येणार होते. कामाचा आदर केला नाही तर काम माणसाला दूर लोटते, असेच शरदसोबत घडल्याचे दीपाली सय्यद म्हणाल्या.
प्रतिक्रिया व्यक्त करा