एसटी महामंडळाच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डधारक प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या कार्डात केवळ पाच रुपयांचं टॉपअप करता येणार आहे. यापूर्वी किमान पन्नास रुपयांचं टॉपअप करणं आवश्यक होतं. ही अट रद्द करण्यात आली असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
१.४७ कोटी कार्डांची नोंदणी
अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारक लाभार्थ्यांसाठी १६ फेब्रुवारी २०२६ पासून एनसीएमसी कार्ड नोंदणी आणि वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत १.४७ कोटी कार्डांची नोंदणी झाली असून त्यापैकी १.३० कोटी कार्ड सक्रिय करण्यात आली आहेत.
हा निर्णय का घेण्यात आला?
ग्रामीण आणि दुर्गम भागात कमी अंतराच्या प्रवासासाठी कमी भाडं लागतं. तसंच अमृत ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास विनामूल्य असतो. त्यामुळे केवळ स्वच्छता अधिभारासाठी कार्डात मोठी रक्कम ठेवावी लागू नये, या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक सुलभता मिळणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा