पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मतदारसंघ पुनर्रचनेच्या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे लोकसभेच्या एकूण जागांमध्ये मोठी वाढ होणार आहे.
सध्याच्या ५४३ जागांऐवजी आता लोकसभेत ८१५ जागा असतील. म्हणजेच जागांमध्ये तब्बल ५० टक्क्यांनी वाढ होणार आहे. ही वाढ सर्व राज्यांमध्ये समान प्रमाणात लागू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दक्षिणेकडील राज्यांची चिंता दूर करण्याचा प्रयत्न
जागावाढीच्या मुद्द्यावर दक्षिणेकडील राज्यांनी असमानतेची भीती व्यक्त केली होती. मात्र सर्व राज्यांमध्ये समान प्रमाणात वाढ केल्याने ती चिंता दूर करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केल्याचे मानले जात आहे. नव्या रचनेनुसार महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा ४८ वरून ७२ पर्यंत वाढतील, तर केरळमध्ये त्या ३० वरून ४५ होतील.
नव्या रचनेला २०५१ पर्यंत स्थैर्य
मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार मतदारसंघांची नवी रचना पुढील २५ वर्षांसाठी, म्हणजेच २०५१ पर्यंत कायम राहील. या काळात त्यात कोणताही बदल करता येणार नाही. ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात हे विधेयक मांडले जाणार असून दोन तृतीयांश बहुमताने ते मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. या निर्णयामुळे देशाच्या राजकारणात मोठे बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा