मोबाईलच्या छोट्या स्क्रीनवर रील्स पाहण्याऐवजी आता घरातील सर्वजण एकत्र बसून मोठ्या स्क्रीनवर रील्स पाहू शकणार आहेत. मेटा भारतात Instagram for TV हे नवे फीचर आणण्याच्या तयारीत आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स आपल्या टीव्हीवरच Instagram Reels चा आनंद घेऊ शकतील.
## मुंबईतील कार्यक्रमात घोषणा
मेटाने 27 नोव्हेंबर रोजी मुंबईत झालेल्या आपल्या वार्षिक क्रिएटर कार्यक्रम House of Instagram दरम्यान या नव्या फीचरबद्दल माहिती दिली. Instagram for TV च्या मदतीने युजर्स आपल्या आवडत्या क्रिएटर्सचे व्हिडिओ पाहू शकतील. यासोबतच रील्स आणि Stories देखील टीव्हीवर पाहता येतील. मेटाचे म्हणणे आहे की, या फीचरचा उद्देश लोकांना मोबाईलच्या छोट्या स्क्रीनमधून बाहेर काढून एकत्रितपणे मोठ्या स्क्रीनवर व्हिडिओ पाहण्याचा अनुभव देणे हा आहे.
## कधी आणि कसे वापरता येईल?
मेटाच्या माहितीनुसार, Instagram for TV येत्या काही दिवसांत भारतात उपलब्ध होईल. हे फीचर Apple TV, Amazon Fire TV आणि Google TV सारख्या सपोर्टेड डिव्हाइसेसवर काम करेल. युजर्सना आपल्या टीव्हीवर Instagram अॅप इन्स्टॉल करून अकाउंटने लॉगिन करावे लागेल. एकाच वेळी पाच Instagram अकाउंट लॉगिन करता येणार आहेत. त्यामुळे घरातील वेगवेगळे सदस्य आपला आवडता कंटेंट मोठ्या स्क्रीनवर पाहू शकतील. एखाद्या युजरला आपले पर्सनल Instagram अकाउंट टीव्हीवर वापरायचे नसेल, तर तो फक्त टीव्हीवर व्हिडिओ पाहण्यासाठी वेगळे अकाउंटही तयार करू शकतो.
प्रतिक्रिया व्यक्त करा