, २८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

जावेद अख्तर यांचा डिलिमिटेशनवर सवाल

जावेद अख्तर यांनी डिलिमिटेशनवर प्रश्न उपस्थित केला आहे. कुटुंब नियोजन करणाऱ्यांना कमी जागा मिळण्यावर त्यांनी आक्षेप घेतला असून इंडिया आघाडीने विरोध केला आहे.

जावेद अख्तर यांचा डिलिमिटेशनवर सवाल

डिलिमिटेशन विधेयकावरून गीतकार जावेद अख्तर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्या लोकांनी कुटुंब नियोजनाकडे लक्ष दिले नाही, त्यांना जास्त जागा दिल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले असून कुटुंब नियोजन केलेल्यांना कमी जागा मिळणार असल्याने समतोल कसा साधला जाणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

अख्तर यांचे प्रश्न

मतदारसंघांचे पुनर्निर्धारण कसे केले जाणार आणि देशाला विविध मतदारसंघांत कसे विभागले जाणार, हे पाहावे लागणार असल्याचे जावेद अख्तर म्हणाले. ज्या भागातील लोकांनी कुटुंब नियोजन केले, त्यांना कमी जागा दिल्या जात आहेत, असे त्यांनी नमूद केले. या सर्वांची सविस्तर माहिती आल्यानंतर आम्ही पाहू, असेही ते म्हणाले. केंद्रातील सरकार व्यतिरिक्त विरोधी पक्षातील कोण कोण सदस्य या विधेयकाला पाठिंबा देणार आणि कोण हे विधेयक नाकारणार, हे पाहावे लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

इंडिया आघाडीचा विरोध, पवार गटाचा पाठिंबा

दरम्यान, इंडिया आघाडीने डिलिमिटेशन विधेयकाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया आघाडीची बैठक झाली असून ती तब्बल तासभर चालली. या बैठकीला ११ पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. या विधेयकातून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या हिताकडे लक्ष दिले गेले नाही. हे विधेयक अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या विरोधातील आहे. या विधेयकाच्या माध्यमातून मनुस्मृती आणायची आहे. विधेयक आणल्यानंतर ते संविधान हटवतील, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. दरम्यान, इंडिया आघाडीतील सर्वात महत्त्वाचा पक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने या विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीलाही पवार गटाने दांडी मारली. त्यामुळे इंडिया आघाडीला सर्वात मोठा धक्का बसला आहे. पवारांच्या या निर्णयावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. शरद पवार हे पाठीत खंजीर खुपसतात. तसा त्यांचा इतिहास आहे. जिकडे सत्ता असते तिकडे राष्ट्रवादी जाते, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance