मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. पवारांच्या पक्षाला त्यांनी जंतरमंतर असे संबोधले असून याआधीही आपण हेच म्हटले होते, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जुनी पोस्ट पुन्हा चर्चेत
डिलिमिटेशन विधेयकाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. २ जुलै २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी केलेली एक जुनी पोस्ट त्यांनी पुन्हा शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी म्हटले होते की, आज महाराष्ट्राचा सिंहासन चित्रपटातील शेवटच्या दृश्यातील दिगू टिपणीस झाला आहे. उद्धव ठाकरे यांचे ओझे शरद पवार यांना उतरवायचे होते, असेही त्यात नमूद होते. राष्ट्रवादीची पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली असून यथावकाश दुसरी टीमही सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईल, असे भाकीत त्यांनी तेव्हा केले होते.
राजकारणातील चिखलावर चिंता
महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या चिखलावर राज ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता हे किळसवाणे राजकारण बंद पाडेल का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा