सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नऊ जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी ८६.९४ टक्के मतदान झाले होते. खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे हे या निवडणुकीत समोरासमोर आले आहेत. पहिल्या निकालात मोहिते पाटील गटाचे उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील विजयी झाले असून, यामुळे मंत्री जयकुमार गोरे यांना मोठा धक्का बसला आहे.
दुसऱ्या निकालात भाजपची बाजी
दुसऱ्या निकालात भाजपप्रणित सहकार विकास पॅनलचे उमेदवार बाबासाहेब देशमुख विजयी झाले आहेत. सांगोल्याचे शेकापचे आमदार असलेले देशमुख यांनी मोहिते पाटील पॅनलचे संजय इंगोले यांचा पराभव केला.
विजय जनतेला समर्पित; मतमोजणीवर आक्षेप
विजयी उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी आपला विजय माळशिरसच्या जनतेला समर्पित केला आणि सर्व मतदारांचे मनापासून आभार मानले. दरम्यान, मतमोजणी प्रक्रियेवर मोहिते पाटील गटाने आक्षेप घेतला असून, दुग्ध प्रक्रिया मतदारसंघात एक मतपत्रिका कमी असल्याचा आक्षेप नोंदवण्यात आला आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा