गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण सुरू आहे. दोन लाख रुपयांपर्यंत पोहोचलेले सोने थेट एक लाख २७ हजार रुपयांपेक्षा खाली आले आहे. सोने प्रति १० ग्रॅम ७२ हजार रुपयांनी स्वस्त झाले असून, पुढील काही दिवसांत भाव एक लाख रुपयांखाली जाण्याची चर्चा आहे.
घसरणीची कारणे
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावाचा परिणाम सोने आणि चांदीच्या भावावर झाला आहे. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात महागाई वाढल्याचेही सांगितले जात आहे. गेल्या २०० दिवसांत सोन्याचा भाव २० टक्क्यांनी खाली आला असून, सोने आपल्या उच्चांकापेक्षा तब्बल ३७ टक्क्यांनी घसरले आहे. १९८० नंतर सोन्यात इतकी मोठी घसरण पाहायला मिळाली नसल्याचे सांगितले जात आहे.
चांदीही घसरली; खरेदीदार प्रतीक्षेत
सोन्यासोबतच चांदीही प्रति किलो दोन लाख ७५ हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. देशात लग्नसराई सुरू असतानाही अनेकजण सोने एक लाख रुपयांच्या आत जाण्याची वाट पाहत आहेत. काल सोन्याच्या भावात थोडी वाढ झाली होती, तर परवा भाव कोसळताना दिसला होता.
प्रतिक्रिया व्यक्त करा