मतदारसंघ पुनर्रचना विधेयकात महिला आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्यावर नताशा आव्हाड यांनी गंभीर आक्षेप नोंदवला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा आव्हाड यांनी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टद्वारे ही टीका केली आहे. त्यांच्या मते, मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या चर्चेमध्ये महिला आरक्षणाचा मुद्दा आणणे हे केवळ दिशाभूल करणारे आणि हेतुपुरस्सर केलेले राजकारण आहे.
२०२४ मध्येच विधेयक मंजूर झाले होते
नताशा आव्हाड यांनी स्पष्ट केले की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच महिला आरक्षण विधेयक संसदेमध्ये मंजूर झाले होते. त्यामुळे आगामी निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करण्याची संधी भारतीय जनता पक्षाकडे होती. मात्र, भाजपने ती संधी गमावली, असे त्या म्हणाल्या.
भाजपवर आरोप
आता भाजप पुन्हा महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे करून मनमानी पद्धतीने आणल्या जाणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाचे समर्थन करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला. हे विधेयक लोकशाही व्यवस्थेवर थेट आघात करणारे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. दोन्ही मुद्द्यांची सरमिसळ करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा