, २७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

महामार्गावर लष्कराच्या चार विमानांचे लँडिंग आणि टेकऑफ

भारतीय लष्कराच्या चार मायक्रोलाईट विमानांनी गुजरातमधील अमृतसर-जामनगर आर्थिक मार्गावर यशस्वी लँडिंग आणि टेकऑफ केले. महामार्गावर उतरून इंधन भरण्याची ही देशातील पहिली मोहीम आहे.

महामार्गावर लष्कराच्या चार विमानांचे लँडिंग आणि टेकऑफ

आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्रीय महामार्ग हवाईपट्टी म्हणून वापरता येऊ शकतो, हे भारतीय लष्कराने प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. लष्कराच्या चार मायक्रोलाईट विमानांनी गुजरातमधील अमृतसर-जामनगर आर्थिक मार्गावर (राष्ट्रीय महामार्ग ७५४ए) यशस्वी लँडिंग आणि टेकऑफ केले.

या ताफ्यात दोन फिक्स्ड-विंग मायक्रोलाईट विमाने आणि दोन पॉवर्ड हँग ग्लायडर्सचा समावेश होता. कांडला विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर ही विमाने गुजरातच्या पाटण जिल्ह्यातील सांतलपूर तालुक्यातील बाकुत्रा टोल प्लाझाजवळ महामार्गावर उतरली. राष्ट्रीय महामार्गावर चार विमानांच्या ताफ्याने एकत्र उतरून इंधन भरण्याची ही देशातील पहिलीच यशस्वी मोहीम असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

महामार्गाच्या ९४६ ते ९४९ किलोमीटरदरम्यान सराव

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या सरावाचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. ‘विंग्स ऑफ व्हॅलोर अँड युनिटी’ मोहिमेत सहभागी झालेल्या लष्कराच्या ‘टीम माऊंटन ईगल्स’ने महामार्गावरील किलोमीटर ९४६ ते ९४९ दरम्यान यशस्वी लँडिंग व टेकऑफ केल्याचे त्यांनी सांगितले.

नागरी-लष्करी समन्वयाचे उदाहरण

भारतीय लष्कर आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामधील समन्वयाचे हे ऐतिहासिक प्रदर्शन असल्याचे गडकरी यांनी नमूद केले. जागतिक दर्जाच्या महामार्गांमुळे केवळ दळणवळण आणि आर्थिक विकासच होत नाही, तर सशस्त्र दलांच्या धोरणात्मक आणि आपत्कालीन गरजाही पूर्ण होतात, असे त्यांनी सांगितले. योग्य सुरक्षा उपाययोजनांसह महामार्गांचा वापर एअरो-अ‍ॅडव्हेंचर आणि पर्यटनासाठीही होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद करत संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.

अभी जाधव

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance