गोव्याच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राला बळकटी देण्यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत १४८.०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसायातील पायाभूत सुविधा उभारण्यावर आणि मच्छीमारांच्या कल्याणावर विशेष भर दिला जात आहे.
मासेमारी सुविधांसाठी ७७ कोटी
मासेमारीसाठी आवश्यक सुविधा आणि मच्छीमार समुदायाच्या मदतीसाठी ७७.०४ कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. या निधीतून राज्यातील सात जेट्टींचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. तसेच मडगाव येथे अत्याधुनिक घाऊक मासळी बाजार उभारला जाणार असून नवीन मासे उतरविण्याची केंद्रेही विकसित केली जाणार आहेत. या सुविधांमुळे मासळी उतरविणे, हाताळणी आणि विक्रीची व्यवस्था अधिक सुधारेल.
मच्छीमारांना क्यूआर कोडयुक्त आधार कार्ड
मच्छीमारांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांची ओळख सहज पटवण्यासाठी २१,५०० हून अधिक मच्छीमारांना क्यूआर कोड असलेली आधार कार्डे दिली जात आहेत. किनारी भागातील रोजगार आणि मच्छीमार समुदायाच्या उपजीविकेला या उपाययोजनांमुळे मोठा आधार मिळणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा