, २७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

आमदार अनंत सिंह यांच्या मुलीच्या लग्नात ३० लाख रसगुल्ले

बिहारचे आमदार अनंत सिंह यांच्या कन्या शिवांगी सिंह यांच्या विवाहाची जोरदार तयारी सुरू आहे. पाहुण्यांसाठी ३० लाख रसगुल्ले आणि १५० हून अधिक पदार्थ तयार केले आहेत.

आमदार अनंत सिंह यांच्या मुलीच्या लग्नात ३० लाख रसगुल्ले

बिहारच्या मोकामाचे आमदार अनंत सिंह यांची कन्या शिवांगी सिंह हीच्या विवाहाची तयारी आणि भव्य मेजवाणीची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या विवाह समारंभाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी तब्बल ३० लाख रसगुल्ले तयार केले गेले आहेत. बिहारच्या पारंपरिक लिट्टी-चोख्यासह अनेक खाद्यपदार्थांचा मेन्यूत समावेश करण्यात आला आहे. या शाही मेजवाणीच्या आयोजनामुळे परिसरात मोठा उत्साह पसरला आहे.

या शाही विवाहासाठी १५० हून अधिक लज्जतदार पक्वान्ने तयार केली गेली आहेत. मिठाईंवर खास लक्ष देण्यात आले असून रसगुल्ला, गुलाब जामुन, राजभोग, काला जामुन, मालपोहे, जिलेबी, गाजराचा हलवा आणि मखान्याची खीर अशा पदार्थांची रेलचेल आहे. लग्नात १००० हून अधिक हलवाई आणि शेफ मुदपाकखान्यात कामाला लावण्यात आले आहेत.

मेन्यूत काय काय आहे?

या विवाहात बिहारची प्रसिद्ध डीश लिट्टी-चोखा वाढली जात आहे. स्टार्टरमध्ये चाट, गोलगप्पे, आलू टिक्की, डोसा, चिल्ला आणि चाऊमिनचा समावेश आहे. शुद्ध शाकाहारी मेन्यूत पनीर, बटाटा-फ्लॉवर आणि काश्मीरी पुलाव अशा अनेक भाज्यांचा समावेश करण्यात आला आहे. दोन प्रकारच्या पुऱ्या आणि कचोरी, नानपासून ते लच्छा पराठा आणि रुमाली रोटीपर्यंत अनेक प्रकारच्या भाकऱ्या वाढल्या जात आहेत.

चार लाख पाहुण्यांसाठी तयारी

या लग्नसमारंभात जवळपास चार लाख देशी आणि विदेशी पाहुण्यांसाठी १५० हून अधिक डीशेस वाढण्यात येत आहेत. स्टार्टर्स, मेन कोर्स आणि रॉयल डेझर्ट्सचा मेन्यूत समावेश आहे. बिहारच्या देशी पक्वान्नांसह विदेशी डीशेसचाही मेन्यूत समावेश करण्यात आला आहे. लाखो लोकांच्या पंगती बसल्या आहेत, असे म्हटले जात आहे. या भव्य विवाह सोहळ्याची चर्चा बिहारसह देशभरात रंगली आहे.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance