, २६ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

व्हीआयपी येताच स्वच्छता का आठवते? उच्च न्यायालयाची ताशेरे

प्रिन्स विल्यम यांच्या दौऱ्यापूर्वी बॅलार्ड इस्टेट चकाचक झाला. दोन दिवसांचा दिखावा नको, प्रभागात कायमस्वरूपी स्वच्छता राखा, असे उच्च न्यायालयाने बजावले.

व्हीआयपी येताच स्वच्छता का आठवते? उच्च न्यायालयाची ताशेरे

ब्रिटनचे प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस कॅथरीन यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते, विशेषतः दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट परिसर चकाचक करण्यात आला. मात्र, सामान्य मुंबईकरांना वर्षभर अशी स्वच्छता का मिळत नाही? महत्त्वाच्या व्यक्ती शहरात येतात तेव्हाच प्रशासनाला स्वच्छतेची आठवण होते का, असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

दोन दिवसांचा दिखावा नको, कायमस्वरूपी स्वच्छता राखा

दोन दिवसांच्या तात्पुरत्या दिखाव्याऐवजी शहरातील प्रत्येक प्रभागात कायमस्वरूपी स्वच्छता राखा, असे न्यायालयाने बजावले. न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा व्यवस्थापन आणि प्रदूषणासंदर्भातील याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

राज्य सरकार आणि महापालिकेची इच्छाशक्ती असेल तर ते काही वेळातच परिस्थितीत बदल घडवू शकतात, याचा अनुभव आम्ही घेतला आहे. हे काम विजेच्या वेगाने होऊ शकते. मग महत्त्वाच्या व्यक्ती शहरात येतात तेव्हाच तुम्ही या प्रश्नांबाबत जागे होणार का, हे योग्य नाही. या शहराचे कायमस्वरूपी रहिवासी असलेल्या सामान्य नागरिकांसाठी तुम्ही काम केले पाहिजे, असे न्यायालयाने सुनावले.

बॅलार्ड इस्टेटचे उदाहरण देत न्यायालयाचे ताशेरे

काही पाहुणे येणार म्हणून बॅलार्ड इस्टेट परिसराकडे पाहा, तो किती चकाचक आणि सुशोभित झाला आहे. रस्त्यांना रंगरंगोटी करणे, पाण्याने रस्ते धुणे हे तुम्हाला शक्य आहे, तर ते नागरिकांसाठीही करा, असे न्यायालयाने स्पष्ट केले. दोन दिवसांच्या तात्पुरत्या दिखाव्याऐवजी कायमस्वरूपी स्वच्छता राखा. शहरातील प्रत्येक प्रभागात अशी स्वच्छता दिसली पाहिजे, असे न्यायालयाने बजावले.

अभी जाधव

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance