डायबिटीज झाला म्हणजे आयुष्य संपले असे होत नाही. योग्य ती काळजी घेतली तर मधुमेह असलेली व्यक्ती १०० वर्षेही जगू शकते, असा दिलासा तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. व्ही. मोहन यांनी एका विशेष लेखात डायबिटीजच्या रुग्णांसाठी ‘ABCD’ हा सोपा फॉर्म्युला सांगितला आहे. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी हा फॉर्म्युला उपयुक्त ठरतो, असे त्यांचे म्हणणे आहे.
प्रत्येक घरात एक रुग्ण?
आज अनेकजण डायबिटीजसारख्या आजाराने त्रस्त आहेत. अनेकांना ३० अथवा ४० वर्षांनंतर डायबिटीज होतो आणि जवळपास प्रत्येक घरात एकतरी मधुमेही व्यक्ती आढळते, असे लेखात नमूद करण्यात आले आहे.
Leave a Reply