नाताळ आणि नववर्षाच्या सुट्ट्यांमध्ये गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांचा रेल्वे प्रवास अधिक आनंददायी आणि संस्मरणीय करण्यासाठी खास उपक्रम राबविण्याची तयारी सुरू आहे.
या उपक्रमांतर्गत सांताक्लॉजच्या वेशातील कर्मचारी प्रवाशांचे स्वागत करणार असून त्यांना चॉकलेट आणि केकचे वाटप केले जाणार आहे.
मंजुरी अजून बाकी
भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी) यासंदर्भातील प्रस्ताव तयार केला आहे. मात्र, या उपक्रमाला अद्याप रेल्वे मंडळाची मंजुरी मिळणे बाकी आहे.
Leave a Reply