लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी धीरज देशमुख यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत धीरज देशमुख यांनी बाजी मारली आहे. धीरज देशमुख हे अभिनेते रितेश देशमुख यांचे भाऊ आहेत.
उपाध्यक्षपदी अविनाश जाधव
बँकेच्या उपाध्यक्षपदी अविनाश जाधव यांची निवड करण्यात आली आहे. अविनाश जाधव हे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे चुलत बंधू आहेत. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड झाल्याने बँकेच्या नेतृत्वाची पुढील वाटचाल निश्चित झाली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा