अंडी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. अंडी खाल्ल्याने अनेक आरोग्य समस्या दूर होतात. अंडी हा सर्वांत चांगला नाश्ता मानला जातो. काही लोकांना नाश्त्यात दररोज अंडी लागतात. मात्र, अंडी शिजवताना त्यांचे कवच फुटते आणि आतील पांढरा भाग बाहेर येतो, ही अनेकांची तक्रार असते.
पण एक असा घरगुती उपाय आहे, जो केल्याने अंडी कधीच उकळत्या पाण्यात फुटत नाहीत. अंडी शिजवताना पाण्यात लिंबाचा रस पिळा. त्यामुळे अंडी अजिबात फुटणार नाहीत. हा सोपा उपाय केल्याने अंडी व्यवस्थित शिजतात आणि त्यांचे कवचही सुरक्षित राहते.
## लिंबाचा रस का काम करतो?
अंडी गरम पाण्यात उकडली जातात, त्यावेळी आतली हवा गरम होते आणि अंडी फुटतात. उकळत्या पाण्यात लिंबाचा रस घातल्याने अंडी शिजण्यास मदत होते. हे केल्याने अंड्याच्या बाहेरील भागाला तडा जात नाही. लिंबाच्या रसात नैसर्गिक आम्ल असते, ज्यामुळे अंडी फुटत नाहीत.
बऱ्याच लोकांना असे वाटते की, लिंबाचा रस अंडी शिजताना टाकल्याने अंडी आंबट होतील, पण तसे होत नाही. लिंबाचा रस फक्त बाहेरील कवचापुरताच मर्यादित राहतो. त्याचा कोणताही परिणाम आतील अंड्यावर होत नाही.
## या चुका टाळा
एक लक्षात ठेवा की, कधीच फ्रिजमधून काढलेली अंडी थेट गरम पाण्यात टाकू नका. ती काही वेळ बाहेर काढून ठेवा. पाणी मध्यम आचेवर ठेवा. एकदम गॅस मोठा करून अंडी अजिबात उकळू नका.
अंड्याची टरफल काढण्यासाठी कायम लक्षात ठेवा की, अंडी साध्या पाण्यात ठेवा, ज्यामुळे त्याची टरफल लवकर निघण्यास मदत होईल. हा छोटासा उपाय वापरून तुम्ही दररोज परिपूर्ण उकडलेली अंडी मिळवू शकता.
प्रतिक्रिया व्यक्त करा