संविधान दिनानिमित्त नागपूर आणि मुंबई येथे संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले. नागपुरातील संविधान चौकात सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत लोकतंत्र बचाव, भाजप हटाव अशा घोषणा दिल्या. काँग्रेसनेही या आंदोलनात सहभाग नोंदवला.
नागपुरात संविधान चौकात कार्यकर्त्यांची गर्दी
या रॅलीमध्ये अभिजीत दिपके, प्रकाश राज आणि आशुतोष राणा यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखेडे मार्गदर्शन करणार होते. पोलिसांनी या सभेसाठी दोन तासांची परवानगी दिली होती. कार्यकर्त्यांनी हातात तिरंगा घेऊन आपला उत्साह दर्शवला.
मुंबईत वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रॅली
मुंबईतही काँग्रेसने संविधान बचाव रॅली काढली. बांद्रा खेरवाडी सर्कल येथून सुरू झालेल्या या रॅलीचे नेतृत्व वर्षा गायकवाड यांनी केले, तर भाई जगताप आणि सचिन सावंत यांसारखे प्रमुख नेते उपस्थित होते. केंद्र आणि राज्य सरकारकडून संविधानाची होणारी कथित चिरफाड थांबवण्यासाठी हे आंदोलन असल्याचे मुंबईतील नेत्यांनी सांगितले. दिल्ली बचाव आंदोलनानंतर सीजेपीने पुन्हा एकदा संविधान बचाव रॅली सुरू केली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा