स्मार्टफोनमधील हॉटस्पॉट हे वैशिष्ट्य आपण सहसा दुसऱ्या उपकरणाला इंटरनेट देण्यासाठी वापरतो. मात्र त्याचा उपयोग केवळ डेटा वाटण्यापुरता मर्यादित नाही. हॉटस्पॉटच्या मदतीने आणखी काही स्मार्ट कामे सहज करता येतात.
वाय-फायची रेंज वाढवणे
घरातील वाय-फाय सिग्नल काही भागांत कमकुवत पडत असेल, तर फोनचा हॉटस्पॉट त्या ठिकाणी पर्यायी जोडणी म्हणून काम करू शकतो. फोन वाय-फायशी जोडून त्याचा हॉटस्पॉट सुरू केल्यास जवळच्या उपकरणांना इंटरनेट मिळू शकते.
यूएसबी मोडेम म्हणून वापर
फोनला यूएसबी केबलने संगणकाला जोडून हॉटस्पॉट सुरू केल्यास संगणकाला फोनच्या डेटाद्वारे इंटरनेट मिळते. वाय-फाय जोडणी अस्थिर असताना हा पर्याय उपयुक्त ठरतो.
इंटरनेटशिवाय फाइल्स पाठवणे
हॉटस्पॉटच्या स्थानिक जोडणीचा वापर करून इंटरनेटशिवायही मोठ्या फाइल्स एका उपकरणातून दुसऱ्या उपकरणात पाठवता येतात. डेटा खर्च न होता फाइल हस्तांतरण करणे शक्य होते.
या तीन सोप्या ट्रिक्समुळे हॉटस्पॉट हे केवळ इंटरनेट वाटण्याचे साधन न राहता दैनंदिन वापरातील बहुउपयोगी वैशिष्ट्य ठरते.
Leave a Reply