अलिकडच्या काळात सोशल मीडियावर ‘कोर्टिसोल बेली’ हा शब्द प्रचंड लोकप्रिय झाला आहे. अतिप्रमाणात मानसिक ताणामुळे पोटावर हट्टी चरबी साचते आणि काही विशिष्ट आहार किंवा सप्लिमेंट्स घेतल्याने कोर्टिसोल कमी होऊन पोट सपाट होते, असे अनेक दावे केले जातात. पण या दाव्यांमागचे सत्य काय आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
ताण, कोर्टिसोल आणि चयापचय
दीर्घकालीन ताण, कोर्टिसोल आणि चयापचय यांच्यातील संबंधात काही प्रमाणात तथ्य नक्कीच आहे. मात्र वैद्यकीय शास्त्रामध्ये ‘कोर्टिसोल बेली’ असे कोणतेही अधिकृत निदान अस्तित्वात नाही. त्यामुळे ताण हेच पोटावरील चरबीचे एकमेव कारण असल्याचे म्हणता येत नाही.
पोटावर चरबी वाढण्याची कारणे
पोटावर चरबी वाढण्यामागे एकूण उष्मांकांचे सेवन, शारीरिक हालचाली, झोप, आनुवंशिकता, वय, संप्रेरकांमधील बदल आणि चयापचय आरोग्य असे अनेक घटक कारणीभूत असतात. त्यामुळे डाएट आणि व्यायाम करूनही पोटावरील चरबी कमी होत नसेल, तर केवळ एकाच कारणाकडे बोट दाखवणे योग्य नाही. जीवनशैलीतील एकूण बदल आणि नियमित तपासणी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
Leave a Reply