स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेतली जाणार आहे. ब्रिटनमध्ये यासाठी जगातील सर्वात मोठी वैद्यकीय चाचणी सुरू करण्यात आली असून, देशभरातील सुमारे सात लाख महिलांना त्यात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले जाणार आहे.
‘एडिथ’ नावाची चाचणी
‘एडिथ’ असे या चाचणीचे नाव असून, केंब्रिज युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्समधून तिची सुरुवात झाली आहे. ब्रिटनमध्ये पन्नास ते एकाहत्तर वयोगटातील महिलांची दर तीन वर्षांनी नियमित मॅमोग्राम तपासणी केली जाते.
तपासणीची सध्याची पद्धत
सध्या प्रत्येक मॅमोग्रामची तपासणी दोन एनएचएस तज्ज्ञांकडून केली जाते. नवीन चाचणीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
Leave a Reply