महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. देशातील सर्वोत्कृष्ट राज्य सहकारी बँक म्हणून गौरव मिळाल्यानंतर आता बँकेला ‘एक्सलन्स इन सायबर सिक्युरिटी’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
राष्ट्रीय स्तरावर गौरव
सहकारी बँकिंग क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम वापर यासाठी हा सन्मान मिळाला आहे. या पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या सहकारी बँकिंग क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
नवी दिल्लीत पुरस्कार सोहळा
नवी दिल्लीतील चाणक्यपुरी येथील हॉटेल अशोकामध्ये ‘एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६’ हा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात बँकेला सायबर सुरक्षेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Leave a Reply