गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत होती. सोन्याचा दर एक लाख २० हजार रुपयांखाली जाईल का, अशी चर्चा सुरू होती. मात्र आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजाराने वेगळेच चित्र दाखवले. सोमवारच्या सत्रात सोने आणि चांदी या दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी उसळी आली.
सोन्याचा दर १ लाख २५ हजारांवर
एमसीएक्सवर सोन्याचा भाव एकाच दिवसात ३००० रुपयांनी वाढला. त्यामुळे सोन्याचा दर १ लाख २५ हजार रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचला आहे. चांदीच्या बाबतीतही अशीच वाढ दिसून आली. ४ डिसेंबर रोजी मुदत संपणाऱ्या चांदीच्या भावात ५००० रुपयांची वाढ झाली असून तिचा दर १ लाख ५३ हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. काही दिवसांपूर्वी चांदीचा भाव १,४७,८१३ रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला होता.
महिन्याभराच्या तुलनेत सोनं अजूनही स्वस्त
एका दिवसात मोठी वाढ झाली असली तरी महिन्याभरापूर्वीच्या दरांच्या तुलनेत सोनं अजूनही स्वस्त असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सोने खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ चांगली संधी ठरू शकतो, असे मत व्यक्त केले जात आहे. मात्र कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असाही सल्ला देण्यात आला आहे.
Leave a Reply